Yerwada Juvenile Escape: येरवडा बालसुधारगृहातून पसार अल्पवयीन ताब्यात; फूस लावणारे दोघे अटकेत

मार्केट यार्ड-गंगाधाम रस्त्यावर बिबवेवाडी पोलिसांची कारवाई; पसार झाल्यानंतर शोध घेत असताना तिघे सापडले
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

पुणे: येरवड्यातील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून पसार झालेल्या अल्पवयीनासह तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. मार्केट यार्ड-गंगाधाम रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली, तर याप्रकरणी पृथ्वी दीपक श्रीवास्तव (वय १८, रा. श्रीनगर, जि. गोंदिया), प्रेम एकनाथ जाधव (वय १८, रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली.

Arrest
Mhallunge Road Potholes: म्हाळुंगेच्या खड्ड्यांनी घेतला चिमुकल्याचा जीव; रस्तेदुरुस्तीच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न

गेल्या १३ ऑगस्ट रोजी बालसुधारगृहातून रात्री अल्पवयीन पसार झाला होता. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू होता. अल्पवयीन व त्याला फूस लावणारे दोघे मार्केटयार्ड-गंगाधाम रस्त्यावर एका चहा विक्री करणाऱ्या दुकानाजवळ थांबल्याची माहिती बिबवेवाडी पोलिसांना मिळाली.

Arrest
Sugar Price Hike: साखरेच्या दरात तीन दिवसांत क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ; किरकोळ दर ६० रुपयांवर

त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त मिलिंद माेहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, गुन्हे शाखेचे निरीक्षक सूरज बेंद्रे, उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलिस संजय गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news