पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाकडून पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांकरिता अनुदानित पास वाटप योजना सुरू केली आहे.
या योजनेनुसार पुणे महापालिकेच्या शाळेतील 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अनुदानित मोफत बस पास वाटप करण्यात येणार आहे.
तर, पुणे मनपा हद्दीतील खासगी शाळेतील 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के अनुदानित असलेल्या पासचे वाटप करण्यात येणार आहे. या पाससाठी 12 जूनपासून अर्जाचे वाटप सर्व आगारांमधून व सर्व पासकेंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच, शैक्षणिक संस्थांनी एकत्र भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा