पुणे

पुढारी इफेक्ट : हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी अखेर पीएमपी बस सुरू

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी पीएमपी प्रशासनाच्या वतीने आजपासून (दि. 22) पासून बससेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांची संख्या कमी आहे, त्यामुळे पीएमपीला परवडत नाही, असे सांगत पीएमपी प्रशासनाने हडपसर रेल्वे टर्मिनल येथील बससेवा बंद केली होती.

यासंदर्भात दै. 'पुढारी'मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. हैदराबाद एक्सप्रेस आणि इतर पॅसेंजर गाड्यांचे सुमारे 900 प्रवासी दररोज हडपसर स्थानकावरून ये-जा करतात. बस बंद केल्याने त्यांचे मोठे हाल होत होते. हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानकादरम्यान ही बस धावेल. त्यासोबतच येथील मुंढवा चौक ते केसनंद फाटा (वाघोली) या मार्गावरसुद्धा आजपासून बस सेवा सुरू होणार आहे. ही सेवा दर तासाला असेल. टर्मिनलवरील सेवा रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकानुसार असेल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT