राज्यातील 99 लाख शिधापत्रिकाधारकांना मिळाला आनंदाचा शिधा

राज्यातील 99 लाख शिधापत्रिकाधारकांना मिळाला आनंदाचा शिधा

मुंबई : गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार आतापर्यंत राज्यातील 99 लाख 59 हजार 962 शिधा पत्रिकाधारकांना (65 टक्के) आनंदाचा शिधा मिळाला आहे. सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत संपूर्ण शिधा वाटपाचे काम पूर्ण होणार आहे. एक सप्टेंबरपासून आनंदाचा शिधा वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चणा डाळ आणि एक लिटर खाद्यतेल दिले जात आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यातील सर्व शिधा वाटप दुकानदारांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे, अशी माहिती अधिकार्‍याने दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news