पुणे

Pune News : महापालिकेचे वेतन महिन्याच्या एक तारखेला!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका, शिक्षण मंडळाचे अधिकारी आणि सर्वच कर्मचार्‍यांचे वेतन आणि पेन्शन न चुकता प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला होणार आहे. यासाठी महापालिकेने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये डाटा अपलोडिंग आणि चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेने अनेक सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. यामध्ये कर्मचार्‍यांच्या हजेरीपासून वेतनापर्यंतच्या सॉफ्टवेअरचाही समावेश आहे.

सध्या महापालिकेचे सुमारे 18 हजार कायम, रोजंदारी आणि कंत्राटी, तसेच शिक्षण मंडळाकडील सुमारे 7 हजार कायम, रोजंदारी आणि कंत्राटी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे 'बिल क्लार्क'च्या माध्यमातून वेतन, तसेच पेन्शन देण्यात येत आहे. यासाठी वापरण्यात येणारी संगणक प्रणाली जुनी असल्याने कर्मचार्‍यांच्या रजा व अन्य देणी अथवा येणी कॅल्क्युलेशनमध्ये चूक झाल्यास वेतनालाही विलंब होतो. यामुळे कर्मचार्‍यांना बँक लोन्स व इतर देणी देण्यातही अडचणी निर्माण होतात.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मागील वर्षी वेतन आणि पेन्शनसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्याचा निर्णय घेतला. हे सॉफ्टवेअर तयार झाले असून, त्यामध्ये कर्मचार्‍यांची विभागवार आणि श्रेणीनिहाय इत्यंभूत माहिती लोड करण्यात आली आहे. या कामासाठीच बराच वेळ लागला. यानंतर तांत्रिक तपासणीदेखील करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी मशिन्सही लावण्यात आली आहेत.

या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून येत्या एक जानेवारीपासून सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात पहिल्याच दिवशी वेतन आणि पेन्शन जमा होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. सध्या वेतनासाठी 150 बिल क्लार्क नेमलेले आहेत. या सॉफ्टवेअरच्या वापरानंतर या बिलक्लार्ककडे अन्य काम सोपविण्यात येणार आहे. तर, सॉफ्टवेअर संचलनासाठी केवळ 25 जणांचा स्टाफ पुरेसा होणार आहे, अशीही माहिती बिनवडे यांनी दिली.

वेतन दोन दिवसांत मिळणार

शिक्षण मंडळाकडे एकवट वेतनावर शिक्षक नेमले आहेत. तसेच, रोजंदारीवर शिक्षकेतर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अगदी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत वेतनासाठी वाट पाहावी लागत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता रवींद्र बिनवडे यांनी येत्या दोन दिवसांत सर्वांचे वेतन होईल

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT