पुणे: शहराचे सौंदर्य आणि सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर जाहिरात फलक, बॅनर, फ्लेक्स आणि झेंड्यांविरुद्ध पुणे महानगरपालिकेने मोठी कारवाई हाती घेतली आहे. (Latest Pune News) , , , , , , , , ,
महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार परवाना व आकाशचिन्ह विभागाने शुक्रवारी (दि. 24 ऑक्टोबर) दिवसभरात शहरभर मोहीम राबवून तब्बल 4634 बेकायदेशीर फ्लेक्स, बोर्ड, बॅनर आणि 134 झेंडे काढण्यात आल्याची माहिती आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार परवाना व आकाशचिन्ह विभाग, तसेच सर्व परिमंडळांतील सहायक आयुक्तांच्या पथकांनी ही कारवाई केली. या मोहिमेत मुख्यतः धोकादायक व अनधिकृत जाहिरात फलक, बांबूवर लटकवलेले बॅनर, रस्त्यांवरील फ्लेक्स व झेंडे काढण्यात आले. शहरातील प्रमुख चौक, महत्त्वाच्या रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फलकांमुळे नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली.
महापालिकेने या संदर्भात दररोजची निष्कासन मोहीम चालू ठेवण्याचे निर्देश दिले असून, संबंधित विभागांकडून दैनंदिन अहवाल आयुक्तांना सादर करण्याचेआदेशही देण्यात आले असल्याचे जगताप यांनी सांगितले.