पुणे: शेतकर्यांसाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणार्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत (पीएमकेएसवाय) नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या कामांसाठी 588 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 301 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
आत्तापर्यंत एकूण निधीपैकी 51 टक्के निधी खर्च झाला, तर एकूण मंजूर 26 हजार 205 कामांपैकी आत्तापर्यंत 12 हजार 621 कामे पूर्ण झाली आहेत. ही योजना पाच वर्षांसाठी असून, मार्च 2026 अखेर उर्वरित कामे पूर्ण करावी लागणार आहेत. राज्यात या कामांमध्ये पुणे मंडळ आघाडीवर असून, आत्तापर्यंत 67 टक्के निधी आणि 70 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. (Latest Pune News)
या योजनेंतर्गत राज्यभर 26 हजार 205 कामे मंजूर झाली आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 12 हजार 621 कामे पूर्ण झाली असून, 4 हजार 427 कामे प्रगतिपथावर आहेत. एकूण 22 हजार 455 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तर, 22 हजार 703 कामांना तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. उर्वरित कामांसाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेण्याचे काम सुरू आहे. दिवाळीनंतर या प्रलंबित कामांना गती मिळणार आहे. मार्च 2026 पर्यंत सर्व कामे पूर्ण करणे अनिवार्य आहे.
योजनेची सद्य:स्थिती (राज्य)
एकूण मंजूर कामे : 26205
प्रशासकीय मान्यता मिळालेली
कामे : 22455
तांत्रिक मान्यता मिळालेली
कामे : 22703
पूर्ण झालेली कामे : 12621
प्रगतिपथावरील कामे : 442