पुणे

लोकसभा निवडणुकीसाठी नियोजन करा : जिल्हाधिकारी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी योग्य समन्वय व संवाद साधून कामे करावीत; कामांच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करून उत्कृष्ट आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वय अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, महानगरपालिकेचे उपायुक्त महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, सहायक निवडणूक अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. डॉ. दिवसे म्हणाले, सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मानकांचे सर्व अधिकार्‍यांनी अवलोकन करावे. मानके सर्वांना अवगत होईल अशा सोप्या भाषेत भाषांतरित करावीत. तसेच या मानकांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT