पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कचर्याची समस्या वाढत असून त्यातच ई कचर्याची वाढ होत आहे. याचा निपटारा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
भविष्यात ही समस्या वाढत असल्याने नियोजनाचा भाग म्हणून ई-वेस्टची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले जात आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना टीव्ही, संगणक, सीडी, पेन ड्राइव्ह यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा वाढत आहे.
घनकचरा उचलण्याची सोय शहरामध्ये असली तरी ई-वेस्टबाबत नागरिक जागरूक नाहीत. इलेक्ट्रॉनिक वस्तू सातत्याने अद्ययावत होत असते. त्यामुळे कालांतराने कचर्यात फेकली जाते.
त्यामुळे ई कचरा वाढत आहे. टीव्ही, संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांत पारा, शिसे, कॅडमियम, क्रीमियम असे विषारी घटक असतात. त्यामुळे प्रदूषण तर वाढतेच तसेच धोकाही उद्भवू शकतो.
शहरात नादुरुस्त किंवा बंद पडलेले टीव्ही, फ्रीज, संगणकाचे मॉनिटर, हॉस्पिटल तसेच कारखान्यांमधील यंत्र सामग्री, बंद पडलेले जुने मोबाईल, सीडी, डीव्हीडी, फिल्म, बंद पडलेली घड्याळ, रिमोट कंट्रोल खेळणी, नादुरुस्त बल्ब, ट्यूबलाइट पाहायला मिळतात.
शहरातील ई कचरा गोळा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने घरो घरी जाऊन ई कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे.
शहरातील आठ वॉर्डच्या माध्य्मातून ई कचरा संकलन करून ईसीएसकडे पाठवला जात आहे.
त्यावर नंतर प्रक्रिया होत आहे. नागरिकंनाकडून ई कचरा संकलनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.
https://youtu.be/wimwsVNgHnY