पुणे

Pimpri News : ‘नवी दिशा’ संकल्पनेसाठी मत नोंदवा; महापालिकेचे आवाहन

Laxman Dhenge

पिंपरी : महापालिकेच्या वतीने 'नवी दिशा' ही नवी संकल्पना यशस्वीपणे राबविल्याबद्दल संपूर्ण भारत देशातून पिंपरी-चिंचवड या एकमेव शहराची निवड ग्लांगझाऊ अर्बन इनोव्हेशन अ‍ॅवार्डसाठी झाली आहे. या पुरस्कारासाठी नागरिकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत आपले मत नोंदवावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहर दुसर्‍या क्रमांकावर आहे. मत नोंदविण्यासाठी केवळ 8 दिवस शिल्लक आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवी दिशा उपक्रमाअंतर्गत स्थानिक बचत गट व महिला मंडळांना सामुहिक व सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईच काम सुरू केले आहे. महापालिकेचे सामुदायिक व सार्वजनिक शौचालये आहेत. या शौचालयाची दैनंदिन साफसफाई तसेच, देखभाल व दुरूस्तीसाठी त्या भागांतील स्थानिक महिला बचत गट आणि महिला मंडळांना काम देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर देशातील एकमेव शहर

एकूण 400 महिला विविध 40 शौचालयाची उत्तम प्रकारे स्वच्छता करीत आहेत. त्यांच्याकडून शौचालयाची चांगल्या प्रकारे साफसफाई केली जात आहे. या नव्या संकल्पनेचे देशभरातून कौतूक केले जात आहे. ही संकल्पना यशस्वीपणे राबविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहराची चीन देशातील ग्लांगझाऊ अर्बन इनोव्हेशन अ‍ॅवार्डसाठी निवड झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील एकमेव शहर आहे. या पुरस्कारासाठी नागरिकांचे 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन मते नोंदविले जात आहेत.

आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहराला 8 लाख 85 हजार 348 मते मिळाली आहेत. शहर दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर, चीनच्या क्सियानिंग शहराला 15 लाख 24 हजार 306 मते मिळाली असून, ते शहर प्रथम क्रमांकावर आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी महापालिकेच्या लिालळपवळर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांनी आपले मत नोंदवावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT