पुणे

Pimpri News : तळेगाव स्टेशन तलावावर अंधाराचे साम्राज्य

अमृता चौगुले

तळेगाव स्टेशन ; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील वीज कार्यालयाजवळील तलाव परिसरात लाईटची सोय नसल्यामुळे रात्रीच्या वेळी तेथे अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना भीती वाटत आहे.

सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी

तळेगाव स्टेशन तलाव हे निसर्गरम्य ठिकाण असून तेथे भरपूर झाडे आहेत. यामुळे अनेक प्रकाराचे पक्षी तेथे वास्तव्यास असतात. तलावात पाणी असून सभोवताली झाडी, डोंगररांगा असल्यामुळे हे ठिकाण निसर्गरम्य आहे. तसेच, सभोवताली नागरीवस्ती असल्यामुळे नागरिकांचे येणे-जाणे रात्रभर सुरू असते. यामुळे त्यांच्या लुटमारीचीही शक्यता आहे. त्यामुळे तलाव परिसरात सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी आणि लाईटची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तळेगाव स्टेशन परिसरातील अनेक नागरिक हे पहाटे चार वाजल्यापासून फिरण्यास येत असतात. आतापर्यंत काही चोरीच्या घटना घडल्यामुळे नागरिक फिरायला येण्यास घाबरत आहेत.

लूटमार होण्याची भीती

तळेगाव परिसरातील नागरिक तसेच पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून जाणारे अनेक पर्यटक तेथे येतात. तसेच, पहाटेपासून अनेकजण फिरण्यास येत असतात. परंतु, तेथे लाईटची व्यवस्था नसल्यामुळे सायंकाळनंतर तेथे अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे तेथे साप आदी सरपटणार्‍या प्राण्यांचा धोका आहे. तसेच, चोरी व लूटमार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT