जळगांव : चाळीसगांव स्थानक येथे विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक; प्रवाशी गाड्यांवर परिणाम

जळगांव : चाळीसगांव स्थानक येथे विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक; प्रवाशी गाड्यांवर परिणाम
Published on
Updated on

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळ विभागात चाळीसगांव स्थानक येथे जुना पादचारी पूल पाडण्यासाठी ३१ रोजी विशेष पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप-डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे होणारे प्रवाशी गाड्यावर परिणाम होणार आहे.

भुसावळ मध्ये रेल्वे विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानक येथील पदाचारी फुल पाडण्यासाठी अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे ३१ रोजी नियमन खालील रेल्वे स्थानकावर करण्यात आले आहे.

  • यात गाडी क्रमांक ११०७८ जम्मूतवी- पुणे झेलम एक्सप्रेस वाघळी स्थानक येथे ०८.१५ ते ११.०० वाजेपर्यंत ( ०२.४५ तास) नियमन केले जाईल.
  • गाडी क्रमांक १२१४२ पाटलीपुत्र -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कजगाव स्थानक येथे ०८.३० ते ११.०० वाजेपर्यंत ( ०२.३० तास) नियमन केले जाईल.
  • गाडी क्रमांक १५०६५ गोरखपूर- पनवेल एक्सप्रेस गाळण स्थानक येथे ०८.४० ते ११.०० वाजेपर्यंत ( ०२.२० तास) नियमन केले जाईल.
  • गाडी क्रमांक११०६० छपरा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस पाचोरा स्थानक येथे ०८.४५ ते ११.०० वाजेपर्यंत (०२.१५ तास) नियमन केले जाईल.
  • गाडी क्रमांक१२७८० हजरत निजामुद्दीन -वास्को दि गामा गोवा एक्सप्रेस माहेजी स्थानक येथे ०९.५० ते ११.०० वाजेपर्यंत (०१.१० तास) नियमन केले जाईल.
  • गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस म्हसावद स्थानक येथे १०.३० ते ११.०० वाजेपर्यंत (३० मिनिटे) नियमन केले जाईल.
  • गाडी क्रमांक१५९४६ गुवाहाटी -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस शिरसोली स्थानक येथे १५ मिनिटे नियमन केले जाईल.
  • डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन या स्थानकांवर करण्यात आलेले आहे
  • तर गाडी क्रमांक २०१०३ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्सप्रेस हिरापूर स्थानक येथे २५ मिनिटे नियमन केले जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news