पुणे

Pimpri News : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Laxman Dhenge

पिंपरी : चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री मुटकेवाडी ते तळेगाव चौक, चाकण या दरम्यान घडली. समीर पोपट सांडभोर (37, रा. राक्षेवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याप्रकरणी अविनाश पोपट सांडभोर यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ समीर सांडभोर हे कंपनीतून घरी जात होते. दरम्यान, मुटकेवाडी ते तळेगाव चौक दरम्यान चाकण उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीने समोरून जाणार्‍या एका वाहनास पाठीमागून जोरात धडक दिली होती.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT