पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या उन्हाळ्याने आजवरच्या पार्याचा आकडा ओलांडला आहे. दररोज 40 अंश किंवा त्यापेक्षा जास्त असणार्या तापमानाचा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ लागला आहे.
उन्हाचा पारा वाढत असल्याने कामानिमित्त दुपारी ये-जा करणार्यांच्या अंगाची काहिली होऊ लागली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने नागरिक हैराण झाले आहेत.
दुपारच्यावेळी शहरातीळ रस्ते सुनसान होत आहेत. वाहनांवर जाणारे तुरळक प्रमाणात दिसून येत आहेत. बाजारपेठ व बसस्थानकासह शासकीय कार्यालयांतही उन्हाच्या वेळी गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
उन्हामुळे सिमेंटचे रस्ते तापल्याने मोठा त्रास होतो आहे. नागरिक झाडांच्या व इमारतीच्या सावलीचा आश्रय घेताना दिसतात. शहरातील बागा व उद्यानामध्ये गर्दी वाढू लागली आहे.
ऊन वाढू लागल्याने फळांचा रस, उसाचा रस, ताक विक्री करणार्यांच्या दुकानांसमोर गर्दी दिसून येत आहे. दिवसभर उन्हात फिरणारी मंडळी फळांचा रस, ताक किंवा बर्फाचे गोळे खाणे पसंत करत आहेत.
उष्णतेचा परिणाम प्राणीमात्रांवरही होत आहे. जनावरे, कुत्री, मांजरीही झाडांची सावली, पाण्याच्या ठिकाणी किंवा ओलसर जागेचा विसावा घेऊन उन्हापासून बचाव करत आहेत.
दुपारी बारानंतर ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील वर्दळ असलेल्या रस्त्यांवरही सामसूम जाणवत आहे. दिवसेंदिवस तपमानात वाढ होत असल्याने हैराण झालेले शहरवासिय खरेदीसाठी सायंकाळी पाचनंतर बाहेर पडताना दिसत आहेत.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच उकाडा जाणवत असल्याने दिवसभर नागरिकांना उन्हाच्या तडाख्याला सामोरे जावे लागत आहे. एकूणच वाढत्या उकाडयाने शहरवासीय हैराण झाले आहेत.
https://youtu.be/sy4fJKVdutA