पुणे

Pimpri Crime News : वृद्धाला रागावल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

Laxman Dhenge

पिंपरी : वृद्धाला का रागवतो, असे म्हणत तीन ते चार जणांनी मिळून एका 31 वर्षीय तरुणावर कोयत्याने वार केले. हा सर्व प्रकार सोमवारी (दि. 4) पिंपरी येथे घडला. याप्रकरणी आकाश शम्मी सिंह (31, रा.भाटनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आकाश भुंगा कांबळे (25, रा. पिंपरी), संतोष पवार, राज, पवन मेवाले (पुर्ण नाव माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एक वृध्द जेवणासाठी पैसे मागत होते. दरम्यान, फिर्यादी त्यांना रागावले. त्या वेळी आकाश याने तू रोज या म्हातार्‍याला का रागवतो म्हणत शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. मी कोण आहे ते तुला माहिती नाही, असे म्हणत त्याने इतर आरोपींना बोलावून घेतले. फिर्यादी यांची सासू, पत्नी यांनाही धक्काबुक्की केली. त्यानंतर कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केले. तसेच, सर्वांना मारून टाकण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच, बिअरची बाटली पाठीत मारून गंभीर जखमी केले. पिंपरी पोलिस तपास करत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT