पुणे

Pimpari : तळवडेतील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभाग उपाययोजना करणार

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तळवडे – त्रिवेणीनगर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, त्याचप्रमाणे येथे होत असलेले अपघात आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी यास अनुसरुन वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासन यांच्या समवेत उद्योजक आणि नागरिकांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.

महापालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून हे आश्वासन देण्यात आले. दैनिक पुढारीमध्ये येथील रस्त्यांची झालेली दुरवस्था, वाहतूक कोंडीचा येथे पडणारा विळखा याबाबतचे 'तळवडे इंडस्ट्रियल बेल्टला समस्यांचे ग्रहण' हे सविस्तर वृत्त 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाले. दरम्यान, माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना तळवडे येथील वाहतूक समस्या व अपघातांबाबत निवेदन दिले होते.

त्यानुसार, त्याबाबत पाहणी करण्यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, महापालिकेचे वाहतूक नियंत्रक बापू गायकवाड, तळवडे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी येथील अपघात स्थळाची पाहणी केली. या प्रसंगी ज्योतिबानगर इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष टीकाराम शर्मा, सचिव किर्ती शहा, राजेश शर्मा व नीरज मंत्री तसेच तळवडे ग्रामस्थ आजी-माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिक व वाहनचालकांना येथे जाणवणार्या समस्या समजावुन घेतल्यानंतर महापालिकेच्या वतीने सर्व सूचनांचे निरसन करण्याचे आश्वासन वाहतूक विभागाचे उपायुक्त बापू बांगर, महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम व अन्य अधिकारी वर्गाने दिले. परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करावे. त्याचप्रमाणे रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारावे. सक्षम वाहतूक पोलीस व वार्डन यांची संख्या वाढविण्यात यावी. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मदत करावी, आदी मागण्या भालेकर
यांनी केल्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT