पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या 20 विभागांच्या दैनंदिन कामकाजासाठी जीआयएस कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीनुसार यापुढे महापालिकेचे कामकाज चालणार आहे. या प्रणालीचा वापर करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका देशातील पहिली महापालिका आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
स्थापत्य, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, विद्युत, पर्यावरण अभियांत्रिकी, अग्निशमन, उद्यान, आरोग्य, भूमी आणि जिंदगी, वैद्यकीय, करसंकलन, समाजविकास, ड्रेनेज, आकाशचिन्ह व परवाना, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, क्रीडा, अणुविद्युत व दूरसंचार, नगररचना, पशुवैद्यकीय, पाणीपुरवठा या विभागांसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
महापालिका कामकाजास गती मिळणार
महापालिकेच्या विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करणे. नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ होण्याच्या दृष्टीने महापालिका व स्मार्ट सिटीद्वारे जीआयएस प्रणाली हाती घेण्यात आली आहे.
देशातील पहिलाच प्रकल्प आहे. पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे.
संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना निर्णय घेणे सोपे होणार आहे. कामकाजाला गती मिळणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
विभागांत या सुविधा मिळणार
- नगररचना विभाग – जीआयएस आधारित डीपी योजना, सर्व आरक्षण क्षेत्रे, विभागांतर्गत सेवा, डीपी नकाशा,
योजना, डीपी टिप्पणी. - स्थापत्य विभाग- कार्यान्वित रस्ता, डीपी रस्ता, नॉन-डीपी रस्ता, पूल, भुयारी मार्ग, पदपथ, ग्रेडसेपरेटर, लहान पूल, रेलिंग, बीआरटीएस रस्ते, बसथांबे.
- पाणीपुरवठा विभाग- अस्तित्वात असलेले पाणीपुरवठ्याचे जाळे, पाणी जोडण्या, व्हॉल्व्ह, पाण्याच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र
- मलनिस्सारण व ड्रेनेज विभाग – मलनिस्सारण आणि ड्रेनेजचे जाळे, स्टॉर्म वॉटर जाळे, स्टॉर्म वॉटर नेटवर्क, मॅनहोल, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प तसेच अंतर्गत कार्यपध्दतीचे कामकाज
- विद्युत विभाग- इलेक्ट्रिक पोल, फीडर पिलर, स्ट्रीट लाइट आदीची माहिती.
- क्रीडा विभाग – क्रीडा सुविधा, मैदान, जीम, टेनिस कोर्ट, बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव, कार्यालयीन कामकाज
- वैद्यकीय विभाग – रुग्णालयांची ठिकाणे, विभागांतर्गत कामकाज. अग्निशमन विभाग – अग्निशमन दलाच्या स्थानकांची ठिकाणे व आणि इमारती.
- उद्यान विभाग – उद्यानांचे क्षेत्र आणि स्थान, प्राणिसंग्रहालय, पर्यटन य प्रमुख ठिकाणे, स्मारके.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.