Result Pudhari
पुणे

PCB CET Result 2026: पीसीबी सीईटी निकाल जाहीर; ११ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल, विद्यार्थिनींचीही चमक

२.६३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत ११ जणांना शंभर टक्के गुण; सर्व यशस्वी उमेदवार महाराष्ट्रातील

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलतर्फे घेण्यात आलेल्या पहिल्या संधीच्या पीसीबी सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या सीईटी परीक्षेमध्ये ११ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले आहेत. यातील ८ विद्यार्थी असून, ३ विद्यार्थिनी आहेत. यातील सर्व ११ विद्यार्थी राज्यातील असून, एकही विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरील नाही. निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सीईटी प्रवेश परीक्षा दिनांक २१ ते २६ एप्रिल २०२६ रोजी सहा दिवसांमध्ये ११ सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण २ लाख ८४ हजार ६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत ११ सत्रांत मिळून २ लाख ६३ हजार २१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १ लाख ३ हजार ३६० विद्यार्थी होते आणि १ लाख ५९ हजार ८४८ विद्यार्थिनी होत्या तर ५ तृतीयपंथीय होते. यामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीची संख्या जास्त आहे. याला ९२.६६ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

पीसीबी समूहाच्या पहिल्या संधीच्या या सीईटीमध्ये एकूण ११ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. राज्यातील नागपूर येथील आदित्य अभिषेक सोमाणी, पालघर येथील झील हितेश छेडा, मुंबई शहर येथील ॲशले कोस्टॅनसीओ फर्नांडिस, कोल्हापूर येथील अथर्व उत्तम गडदे, सोलापूर येथील कुमारी प्रतीक्षा दीपक गाढवे, धुळे येथील अथर्व अविनाश काकुळडे, सांगली येथील सार्थक महेश पाटील, कोल्हापूर येथील साहिम सादिक पटवेगर, पुणे येथील राशी अमितकुमार चोप्रा, ठाणे येथील सौरीश सेन व पुणे येथील वरद अवधूत वैद्य या राज्यातील ११ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. यामध्ये ३ विद्यार्थिनी आहेत. या निकालात राज्याबाहेरील एकही विद्यार्थी १०० टक्के पर्सेंटाईल मिळविणारा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT