NCP Politics Pawar Family Meeting pudhari photo
पुणे

NCP Politics Pawar Family Meeting: पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र... विद्या प्रतिष्ठान येथे आजही बैठक; युगेंद्र पवार देखील उपस्थित

Anirudha Sankpal

NCP Politics Pawar Family Meeting: दिवंगत अजित पवार यांना ज्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावर अग्नी देण्यात आला त्या ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याबाबत पवार कुटुंबियांमध्ये चर्चा सुरू आहे. काल (दि, ४ फेब्रुवारी) शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक झाली होती. यानंतर अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा झाल्याचे तसेच अजित पवार हे विद्या प्रतिष्ठनमध्ये कार्यरत होते. त्यांच्या जागी कोणाची निवड करायची याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार सपत्नीक विद्या प्रतिष्ठानकडे रवाना देखील झाले आहेत.

दरम्यन, आजही विद्या प्रतिष्ठन इथं पवार कुटुंबीय एकत्र येत असून या बैठकील शरद पवार, पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हजेरी लावतात का याबाबत देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. स्मारकासोबत अनेक विषयांबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रिकरणाबाबत देखील चर्चा होते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

काल बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबात बैठक पार पडली. यावेळी शरद पवार पार्थ पवार जय पवार आणि अजित दादांच्या भगिनी विजया पाटील यांच्या चर्चा झाली. विद्या प्रतिष्ठानच्या आवारामध्ये दिवंगत अजित पवार यांच स्मारक उभारण्यात येणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या स्मारकाची जागा निश्चित करण्यासाठी पवार कुटुंबात चर्चा झाली.

पुढारी न्यूजचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बारामतीतले जे विद्या प्रतिष्ठान आहे त्यावर शरद पवार अध्यक्ष पदावरती आहेत. इतर पवार कुटुंबातील व्यक्ती अजित पवार असतील योगेंद्र पवार असतील असे पवार कुटुंबातले अनेक व्यक्ती या संस्थेच्या विश्वस्त पदांवरती देखील आहेत.'

कालच्या बैठकीत पार्थ पवार, जय पवार, विजया पाटील उपस्थित होते. दिवंगत अजित पवार यांचे स्मारक कुठे करायचं नेमकी ती जागा कुठे ठरवायची यावरती एक बैठक पार पडली अशी माहिती आहे.

त्यानंतर पार्थ पवार, जय पवार असतील यांनी ज्या ठिकाणी दिवंगत अजित पवारांचे अंत्यमसंस्कार करण्यात आले तिथे त्यांनी पाहणी केली प्लॅन एक बघितला की नेमकी स्मारक कुठे बांधलं जाईल त्यानंतरन शरद पवार त्या ठिकाणून बाहेर पडले सेंट्रल बिल्डिंग मधून त्यांनी दोन ठिकाणची पाहणी केली त्या संस्थेमध्येच आता कुठेतरी स्मारक बांधलं जाईल अशी शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT