पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड आणि मावळातील अनेक गावांची तहान भागविणारे पवना धरण हे शनिवार (दि. 19) अखेर 97.73 टक्के भरले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंतची धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ही स्थिती होती. धरणामध्ये जून महिन्यापासून आतापर्यंत 2 हजार 108 मिलिमिटर इतका पाऊस झाला आहे.
गतवर्षी आजच्या तारखेला धरणामध्ये 98.58 टक्के इतका पाणीसाठा होता. त्या तुलनेत धरणामध्ये यंदा शनिवारी सकाळी सहापर्यंत 97.73 टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली. पाऊस विलंबाने आला असला तरीही पावसाने चांगला जोर पकडल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास धरण पूर्ण भरत आले आहे.
हेही वाचा