Pune Municipal Election Analysis 11 Pudhari
पुणे

Pune Municipal Election Analysis: पौड रोड प्रभाग ११ मध्ये काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचा एक, भाजपचा एक जागेवर विजय

रामबाग–शिवतीर्थनगर प्रभागात काँग्रेस–राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम; भाजपच्या प्रयत्नांना मर्यादा, मतविभाजनाचा फटका

पुढारी वृत्तसेवा

दीपक पाटील

पौड रोड: महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीप्रमाणे या वेळी देखील रामबाग-शिवतीर्थनगर कॉलनी प्रभागात (क्र.11) काँग््रेास दोन, राष्ट्रवादी काँग््रेास एक आणि भाजपने एका जागेवर विजय मिळवला आहे. कोथरूड परिसरातील इतर प्रभागांत भाजपच असल्यानेही या निवडणुकीत प्रभाग 11 मधील सर्वच जागा सहज जिंकण्याचा आत्मविश्वास पक्षाच्या नेत्यांना होता. मात्र, येथे त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरही केवळ एकाच जागेवर भाजपला यश आले आहे.

प्रभाग 11 हा राष्ट्रवादी काँग््रेास व काँग््रेासचा गड मानला जातो. राष्ट्रवादी काँग््रेासचे नेते, माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन मानकर आणि काँग््रेासचे रामचंद्र कदम यांनी या प्रभागात भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले. गेली अनेक वर्षांपासून मानकर कुटुंब नागरिकांच्या समस्या सोडवत आहे. दीपक मानकर यांनी महापालिकेत नगरसेवक, उपमहापौर, तसेच राष्ट्रवादी काँग््रेासचे शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. मात्र, त्यांनी या निवडणुकीत मुलगा हर्षवर्धन यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. हर्षवर्धन यांनी गेल्या काही वर्षांत दिवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. याचा त्यांना या निवडणुकीत फायदा झाला असून, ते विजयी झाले आहेत.

2012 मध्ये या प्रभागात राष्ट्रवादी काँग््रेास आणि काँग््रेासचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर 2017 मध्ये भाजपकडून छाया मारणे निवडून आल्याने या वेळी चारही जागांवर विजयाचा आत्मविश्वास भाजपच्या नेत्यांना होता. मात्र, तसे झाले नाही. चार वर्षांच्या खंडानंतर निवडणुका आल्याने प्रस्थापितांना आव्हान देण्यासाठी अनेक जण मैदानात उतरले होते. भाजपने काही बदलही या प्रभागात केले होते. परंतु काही निष्ठावंत दुखावल्याने त्यांच्या नाराजीचा फटकाही भाजपला या प्रभागात बसला आहे. राष्ट्रवादी काँग््रेासकडून उमेदवारी न मिळाल्याने बंड करीत काँग््रेासकडून प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दीपाली डोख यांनी ‌‘ब‌’ गटातून विजय मिळवला आहे.

या प्रभागात दोन वेळा निवडून आलेल्या वैशाली मराठे यांनी काँग््रेासची साथ सोडत शिवसेनेकडून ‌‘क‌’ गटातून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या उमेदवार मनीषा बुटाला यांनी ‌‘क‌’ गटातून विजय मिळवला आहे. काँग््रेास आणि राष्ट्रवादी काँग््रेासमधील अंतर्गत गटबाजीमुळे मतविभाजन झाल्याने त्यांचा विजय सोपा झाला. राष्ट्रवादी काँग््रेासचे हर्षवर्धन मानकर ‌‘अ‌’ गटातून 19116 मते मिळवत विजयी झाले. तर, त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार अजय मारणे यांना 15297, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळासाहेब धनवडे यांना 2797 मते मिळाली. काँग््रेासच्या उमेदवार दीपाली डोख यांना ‌’ब‌’ गटातून 12535 मते मिळली.

तर त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार शर्मिला शिंदे यांना 11408 आणि राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवार तृप्ती शिंदे 10130 मते मिळाली. भाजपच्या मनीषा बुटाला यांनी ‌‘क‌’ गटातून 12789 मते मिळवली आहेत. त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग््रेासचे उमेदवार नयना सोनार यांना 11515, तर राष्ट्रवादी काँग््रेासच्या कांता खिलारे यांना 2027 आणि शिवसेनेच्या वैशाली मराठे यांना 4428 मते मिळाली. ‌‘ड‌’ गटातून काँग््रेासचे रामचंद्र कदम यांनी 23712 मते मिळवली आहेत. तर, त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार अभिजित राऊत 11631, मनसेचे अर्चना भगत यांना 1608 आणि शिवसेनेचे उमेदवार नितीन पवार यांना 1529 मते मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT