खूनप्रकरणात दोघांना अटक Pudhari
पुणे

Murder Case Arrest: पौड खूनप्रकरणात दोघांना अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

सागर मेश्राम हत्येतील आरोपी नवी मुंबईत पकडले; दोघांवर पूर्वीचे गुन्हे उघड

पुढारी वृत्तसेवा

पौड: पौड (ता. मुळशी) येथे असलेल्या परमार बंगल्याशेजारी दारवली गावच्या हद्दीत सागर मेश्राम (वय ३२, रा. गंगापुरी, बाई, जि. सातारा) याचा खून झाला होता. याप्रकरणी पौड पोलिस तसेच गुन्हे शाखेने दोघांना नवी मुंबई येथून अटक केली. याप्रकरणी कुमार लालू ऊर्फ अरुण राठोड (वय २१, रा. बावधन, ता. बाई, मूळ रा. आगरखेड, ता. इंडी, कर्नाटक), शिवशरणाप्पा ऊर्फ काली बसवराज शटकर (वय २५, रा. गादगी, ता. बौदर, कर्नाटक) यांना अटक केली. (Latest Pune News)

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक बिलास परमार (रा. कॅम्प, पुणे) यांच्या मालकीचा पौड वेधे बंगला आहे. मातिकाणी गेली काही वर्षे हिंदूराष्ट्र सेनेचे धनर्जप देसाई यांचे वास्तव्य आहे. मयत सागर हा या बंगल्यात गुराख्याचे काम करायचा, त्याचा मृतदेह २४ ऑक्टोबर रोजी आढळला. देसाई यांच्याजवळ तू कोण तसेच तू मोठा की मी मोठा या वर्चस्वावरून या तिघांत बाद झाला होता. यानंतर राठोड आणि शटकर यांनी गोठ्यातच सागर पाला दगड व रॉडने मारहाण केली. यानंतर त्याचा मृतदेह बाहेर आणून टाकला.

या घटनेनंतर दोघे फरार झाले होते. त्यांच्या मागावर पौड पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक होते. आठ दिवसांनी दोन्ही आरोपींना नवी मुंबई येथून पोलिसांनी अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, सुधीर कदम, गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक दत्त-जीराव मोहिते, सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमंत पासलकर, नाना शेंडगे, समीर शेख, हवालदार रॉकी देवकाते, तुषार भोईटे, अमोल शेडगे, सिद्धेश पाटील, संतोष दावलकर, आबा सोनवणे, ईश्वर काळे, गणेश पवार, सचिन सलगर, गौतम लोकरे, महेश पवार, हनुमंत शेंडगे, मंगेश भगत, सागर नामदास, राजू मोमीन, अतुल ढेरे, भरत मोहोळ यांच्या पथकाने केली.

तिघेही गुन्हेगारी प्रवनीचे सागर मश्राम याच्यावर आधी

सागर मश्राम याच्यावर आधी दंगल, खुनाचा प्रयत्न, मारामारी आणि सरकारी कामात अडथळा असे चार तर आरोपी अरुण राठोड याच्यावर याअगोदर दरोड्याचा तर काली बसवराज शटकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. या तीनही जणांवर अगोदर गुन्हे दाखल असून हे तिघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT