

पुणे : प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्यावतीने 12 नोव्हेंबर रोजी जनतेच्या पासपोर्ट संबंधित समस्यांचे निराकरण करण्याच्या संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.(Latest Pune News)
प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, सर्व्हे नंबर 5/2/2 बाणेर पाषाण लिंकपासपोर्ट कार्यालयात 12 रोजी हे संवाद सत्र दुपारी 3 ते 5 या वेळेत होईल. या सत्रादरम्यान, पासपोर्ट अर्जदार त्यांच्या पासपोर्ट अर्ज, तक्रारीशी संबंधित प्रश्नांसाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.
खालील तपशीलांचा आगाऊ उल्लेख करून
rpo.pune@mea.gov.in
वर लिहिण्याचे आवाहन केले आहे. फाइल क्रमांक, नवीनतम पासपोर्ट क्रमांक (जर असेल तर), नाव, प्रश्न थोडक्यात पाठवावा. पुणे येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून एक पुष्टीकरण ई-मेल पाठविला जाईल. हा पुष्टीकरण ईमेल सादर केल्यानंतरच संवाद सत्रात प्रवेश दिला जाईल. ओपन हाऊससाठी नोंदणी दुपारी 2 वाजता सुरू होईल.