पुणे

प्रवासी वाढले, बसच्या फेर्‍या कमी

backup backup

पिंपरी : पंकज खोले :

पिंपरी-चिंचवड उपनगरात वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या पिंपरी, निगडी आणि पिंपरी या तिन्ही आगारातून जवळपास 382 बसेस धावतात. तर, केवळ 90 मार्ग सुरू आहेत. यापूर्वी पाचशेपर्यंत जाणारी बससंख्या घटली आहे. मात्र, प्रवासी वाढत असल्याने त्याचे व्यस्त प्रमाण पाहण्यास मिळते.

वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि नागरीकरण विस्तारत असताना, दुसरीकडे दळवणासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्याने अन्य वाहनांचा वाहतुकीसाठी उपयोग करावा लागत आहे. शहरातून नवीन मार्ग सुरू करण्याची मागणी होत असताना, सध्या सुरू असलेल्या मार्गावर बस फेर्‍या अपुर्‍या पडत असल्याचे दिसून येते. शहरातील अंतर्गत भागात पीएमपीची फेर्‍या अवेळी व अपुर्‍या असल्याने अनेकजण पीएमपीच्या भरवशावर नसल्याचे दिसून येते.

शहरात आकुर्डी, थेरगाव, भोसरी, चिंचवड, निगडी, प्राधिकरण, चिखली, काळेवाडी, वाकड हा परिसरात दाट लोकवस्ती आहे. या ठिकाणी बसच्या फेर्‍या सुरू आहेत. मात्र, शहरातील समाविष्ट गावातील म्हणजेच मोशी, चर्‍होली, रावेत, किवळे, तळवडे, आळंदी रस्ता, बोपखेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली आहे. मात्र, या ठिकाणी पुरेशी वाहतूक व्यवस्था नसल्याने त्याचा फटका बसत आहे.

त्या मार्गावरील फेर्‍या घटवल्या
शहरातील कमी असलेल्या मार्गावर फेर्‍या काही अंशी घटवल्या आहेत. पिंपरी आगाराून 102 बस आहेत. येथून जाणार्‍या काही मार्गावर फारसी प्रवासी संख्या नसल्याने त्या अन्यत्र वळवल्या आहेत. तर, निगडी विभागातून सर्वाधिक म्हणजेच 176 बस संख्या आहेत. तर भोसरी आगारातून 104 बसेस विविध मार्गावर जातात. शहरातील एकही फेरी बंद केली नसल्याचे सांगून पीएमपीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT