Prithviraj Jachak statement Pudhari
पुणे

Palkhi Highway Bridge Opposition: पालखी महामार्गावर पूल होऊ देणार नाही — पृथ्वीराज जाचक यांचा इशारा

बाह्यवळणाची ठाम मागणी; भवानीनगर–सणसर–लासुर्णेतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध कायम.

पुढारी वृत्तसेवा

भवानीनगर: संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला प्रचंड विरोध असून सणसर, भवानीनगर, लासुर्णे परिसरात पालखी महामार्गाचे पूल होऊ देणार नाही. भवानीनगरमध्ये बाह्यवळण करूनच पालखी महामार्गाचे काम करावे, असा इशारा श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी दिला.

सणसर येथे जाचक यांच्या नेतृत्वाखाली पालखी महामार्गाच्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कामाची चर्चा करण्यासाठी प्रकल्प अधिकारी केशव घोडके यांच्याबरोबर ग््राामस्थांनी चर्चा केली. या वेळी पृथ्वीराज जाचक, सरपंच यशवंत पाटील, पार्थ निंबाळकर, अभय निंबाळकर, शिवाजी काळे, शरद कांबळे, सोमनाथ गुप्ते, शब्बीर काजी, हनीफ तांबोळी, निखिल निंबाळकर, विलास खटके, श्याम सोनवणे, बजरंग रायते, विशाल निंबाळकर व मोठ्या संख्येने ग््राामस्थ उपस्थित होते.

जाचक म्हणाले, उजनी धरणाची मूळ जागा केडगाव येथे होती. मोहिते पाटलांनी ते धरण उजनीला आणले. सध्या या धरणाच्या पाण्यावर 27 ते 28 साखर कारखाने चालत आहेत. धरण बदलता येते मग पालखी महामार्ग बदलता येत नाही का? बारामती तालुक्यात काही नेत्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी पालखी महामार्गाला वळण देण्यात आले. काटेवाडी येथे स्मशानभूमीला वाचवण्यासाठी उड्डाणपूल वळवला, काटेवाडीत पूल का केला नाही? असा प्रश्न जाचक यांनी उपस्थित केला.

छत्रपती कारखाना 70 वा गाळप हंगाम करत असून कारखान्याच्या भिंती लोडबेरिंगमध्ये बांधलेल्या आहेत. महामार्गाच्या कामामुळे भिंतींना नुकसान होऊ शकते. कारखान्याला वाचवण्यासाठी बाह्यवळण काढावेच लागेल. रस्त्याच्या कामासाठी जनतेचा पैसा आहे, तो जनतेच्या हितासाठी वापरला पाहिजे. कारखान्याने पालखी महामार्गाचे पैसे घेतले असतील तर ते मी स्वतः परत देईल, परंतु कारखान्यावर पूल होऊ देणार नाही. पोलिस बळाचा विचार केला तर या भागातील पालखी महामार्गाचा प्रश्न चिघळेल, असे देखील जाचक म्हणाले.

भवानीनगर, सणसर, लासुर्णे व निमगाव या भागामध्ये पालखी महामार्गाचे काम राहिलेले आहे. सणसर येथे ओढ्यावर दोन्ही बाजूला छोटे पूल करून सेवा रस्ते करण्यात येणार आहेत. ग््राामस्थांनी ज्या काही सूचना केल्या आहेत, त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवून त्यानुसारच काम करण्यात येईल.
केशव घोडके, प्रकल्पाधिकारी, पालखी महामार्ग

सरपंच यशवंत पाटील म्हणाले, अनावश्यक अंडरपास रद्द करावा, कुरवली चौकामध्ये एसटी बसस्थानकाजवळ पालखी चौक करावा, ओढ्यावरील पुलाजवळ मोरी करावी, पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते करावेत, भराव्यामुळे गावाची विभागणी होत असल्यामुळे गावात सात ते आठ फूट उंचीचा भरावा टाकला आहे, तो रद्द करावा, 39 फाट्यापासून सणसरपर्यंत दोन्ही बाजूंनी सेवा रस्ते करावेत, ग््राामस्थांच्या मागणीप्रमाणे पालखी महामार्गाचे काम न झाल्यास कामाला तीव विरोध करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

भवानीनगर, सणसर, लासुर्णे या भागातील पालखी महामार्गाच्या कामाला ग््राामस्थांमधून तीव विरोध आहे. यामध्ये मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, प्रकल्प अधिकारी व ग््राामस्थ अशी बैठक घेऊन पालखी महामार्गाच्या कामाची दिशा ठरवण्यात येईल. तोपर्यंत या भागात काम बंद ठेवा.
पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, श्री छत्रपती कारखाना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT