Hospital Pudhari
पुणे

Pabal Rural Hospital: पाबळ ग्रामीण रुग्णालयातील गैरकारभारावर कारवाईचे संकेत

जिल्हा शल्यचिकित्सकांची अचानक पाहणी; डिलिव्हरी, सोनोग्राफीसह आरोग्य सुविधा तातडीने सुरू करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

शिक्रापूर: पाबळ ग््राामीण रुग्णालयाला शुक्रवारी (दि. 29) अचानक भेट देत जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी सुरू असलेल्या गैरकारभार व नागरिकांच्या आरोग्याबाबत होणारी हेळसांड तसेच रुग्ण सुविधा बंद असल्याचा प्रकार उघडकीस आणला होता.

यानंतर तातडीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ एमपल्ले यांनी रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील विस्कळीत सेवा तसेच सरकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा याची दखल घेत त्यांनी या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराची दखल घेत त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले, डॉ. एमपल्ले यांच्यामध्ये रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर रुग्णालयात डिलिव्हरी सुविधा तातडीने सुरू करणे, रेडिओलॉजिस्ट व एमओआर सेवा उपलब्ध करून देणे, बायोमॅट्रिक मशीन बसवून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवणे, गर्भवती महिलांसाठी मोफत वन टाइम सोनोग््रााफीची सुविधा उपलब्ध करून देणे,

संपूर्ण रुग्णालयाची स्वच्छता व देखभाल करणे, शवविच्छेदन सुरू करणे, याशिवाय रुग्णालयातील पाणीपुरवठा आणि फिटिंग लाइन दुरुस्तीसाठी येणारा सुमारे 30 ते 35 हजार रुपयांचा खर्च जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी स्वतःच्या स्तरावर करण्याची तयारी दर्शविली. दोन दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली पाहिजे, अशा कडक सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

रुग्णालयातील कंत्राटी बेसवरील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून नियमित मासिक आढावा बैठक घेणार असल्याचेही डॉ. एमपल्ले यांनी या वेळी स्पष्ट केले. दर महिन्याला रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा स्वतः घेणार असल्याचे त्यांनी सांगितले, ज्यामुळे आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT