Otur car accident
ओतूर : ओतूर (ता. जुन्नर) हद्दीतील अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील कोळमाथा येथे नंदलाल लॉन्ससमोर स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज (दि. २७) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला.
वरद एकनाथ तांबे (रा.ओतूर) व करण पवळे (रा. पिरंगुट) असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अभिनव गणेश वाकचौरे व ओंकार गोरक्ष शिंदे (रा. साकूर मांडवे) हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
चालकाला पुरेशी झोप मिळाली नसल्यामुळे डुलकी येऊन अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हे चारही तरुण अत्यंत सोज्वळ आणि कामकाजी असल्यामुळे ओतूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताबाबत ओतूर पोलिस तपास करीत आहेत.
राजगड किल्ल्यावर अतिबिकट गुंजवणे दरवाजा मार्गाने चढाई करताना दमछाक झालेल्या 21 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना आज रविवारी (दि. 25) सकाळी दहाच्या सुमारास घडली. नागराज कोरे (वय 21, मूळ रा. बेळगाव कर्नाटक, सध्या रा. पुणे) असे मृताचे नाव आहे. नागराज हा पुण्यातील आपल्या पाच-सहा मित्रांबरोबर राजगडावर फिरण्यासाठी आला होता.