assault case pudhari photo
पुणे

Otur Crime: ओतूरमध्ये ११ वर्षीय मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; किराणा दुकानदाराला अटक

५० रुपयांचे आमिष दाखवल्याचा आरोप; ओतूर पोलिसांकडून पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला ५० रुपयांचे आमिष दाखवून तिच्याशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून एका किराणा दुकानदाराविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित दुकानदाराला अटक करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर - कल्याण महामार्गावरील एका छोट्या गावात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलगी किराणा दुकानात खाऊ घेण्यासाठी आली असता ११ वर्षीय मुलीला ५० रुपये देण्याचे आमिष दाखवून संशयिताने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर पीडित मुलीने प्रथम आपल्या शिक्षिकेला माहिती दिली, शिक्षिकेने मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला असता मुलीच्या पालकांनी ओतूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित दुकानदाराविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलिसांकडून सुरू असून, तपासादरम्यान समोर येणाऱ्या बाबींनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या बाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप आमने हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT