Zilla Parishad Election Campaign Pudhari
पुणे

Otur Dhalevadi Zilla Parishad Election Campaign: ओतूर–धालेवाडी गटात हायटेक प्रचाराचा धडाका; ग्रामीण राजकारणाला नवा चेहरा

ड्रोन, सोशल मीडिया, क्यूआर कोड पत्रके; राष्ट्रवादी, शिंदे गट शिवसेना व मनसेमध्ये प्रभावी प्रचाराची स्पर्धा

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: जुन्नर तालुक्यातील ओतूर-धालेवाडी व रोहकडी गणात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग््रेास, शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांनी हायटेक उंची गाठली आहे. या गटात पहिल्यांदाच इतक्या नियोजनबद्ध, तंत्रज्ञानाधारित प्रचार पाहायला मिळत आहे.

निवडणूक प्रचाराचा बाज आता पूर्णपणे बदलला आहे. प्रचार आता डिजिटल, व्हिज्युअल आणि सायकोलॉजिकल रणनीतींवर आधारित झाला आहे. मोठमोठ्या फ्लेक्सबाजीची जणू शर्यत सुरू आहे. ओतूर-धालेवाडी गट हा जरी ग््राामीण असला तरी या भागात प्रचारात ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर, व्हिडीओ शूटिंग, सोशल मीडियावर लाईव्ह सभा, व्हॉट्‌‍सॲप ग््रुाप्सद्वारे मतदारांशी थेट संवाद, तसेच क्यूआर कोड असलेले पत्रक हे ग््राामीण भागासाठी नवे प्रयोग ठरत आहे.

या गटात प्रचार करताना राजकीय पक्षांनी केवळ घोषणा देण्यावर भर न देता मतदारांचे सूक्ष्म वर्गीकरणाकर भर दिल्याचे दिसते. शेतकरी, महिला बचत गट, युवक, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी समाज, वारकरी संप्रदाय अशा प्रत्येक घटकासाठी वेगळी भाषा, मुद्दा आणि रणनीती आखण्यात आली आहे.

सकाळी शेतात जाण्याआधी चहाच्या कट्‌‍ट्यावर छोट्या बैठका घेऊन प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. दुपारी महिला गटांसोबत महिला कार्यकर्त्या संवाद साधत आहेत, तर संध्याकाळी बाईक रॅली आणि रील्स, रात्री एलईडी व्हॅनद्वारे प्रचार असा धडाका सुरू आहे.

सोशल मीडियाचा ग््राामीण राजकारणात निर्णायक वापर होऊ लागला आहे. पूर्वी स्मार्टफोन केवळ कॉलसाठी वापरणाऱ्या ग््राामीण मतदारांपर्यंत आता फेसबुक, इंस्टाग््रााम रील्स आणि व्हॉट्‌‍सॲप स्टेटसच्या माध्यमातून उमेदवार पोहोचत आहेत. प्रचारासाठी स्थानिक बोलीभाषा, विनोद, शेतकरी प्रश्नांवर आधारित व्हिडीओ वापरले जात आहेत. उमेदवार आपली राजकीय ताकद दाखविण्यात चढाओढ करताना पाहावयास मिळत आहेत. या गटात जागोजागी फ्लेक्स झळकत आहेत.

राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात प्रभावी प्रचारासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. ग््राामीण राजकारणाचा बदलता चेहरा मतदारांसमोर प्रभावीपणे आला आहे. एकूणच, हा प्रचार ग््राामीण राजकारणाच्या नव्या युगाची नांदी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT