पुणे

Onion crop : वाढतं तापमान कांदा पिकाच्या मुळावर; शेतकरी संकटात

Laxman Dhenge

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपासून तापमानवाढीमुळे कांदा पिकाचे शेंडे पिवळे होऊ लागले आहेत. सध्या कांदा फुगवणी अवस्थेत आहे. त्यात कडक उन्हाचा चटका व ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या गाभ्यात पिवळा मावा, थ्रिप्स व रसशोसक किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता बेट भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत. हवामानाच्या लहरीपणामुळे कांदा पिकाचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडतात. सध्या तापमानाचा पारा 38 अंशांवर गेल्याने जोमदार आलेल्या कांदा पिकाची हिरवीगार पात, शेंडे पिवळे पडू लागले आहेत.

बेट भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडी आहेत. बहुतांश कांदा पीक दोन ते तीन महिने कालावधीचे झाले आहे. थोड्याफार प्रमाणात कांदा काढणीस सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून तापमानातील वाढ व ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाच्या फुगवण अवस्थेवर परिणाम होऊ लागला आहे. त्यात पिवळा मावा, थ्रिप्स व रसशोसक किडींचा प्रादुर्भाव झाल्याने कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT