जळगाव क्राईम न्यूज : चोरी गेलेल्या बारा मोटरसायकलसह आरोपी ताब्यात | पुढारी

जळगाव क्राईम न्यूज : चोरी गेलेल्या बारा मोटरसायकलसह आरोपी ताब्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
बाजारपेठ पोलिसांनी तीन मोटरसायकल चोरांना ताब्यात घेत त्यांच्याजवळून 12 मोटर सायकल असा 4 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात 26 जून 2023 रोजी मोटरसायकल चोरीबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार गुन्हेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर करीत होते. यामध्ये तीन मोटरसायक चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले असून ते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद- भुसावळ येथे वास्तव्यात होते. संशयित आरोपी शेख बासीद शेख बाबु (वय 28 रा. रा. सुलतानरपुरा जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा हल्ली मुक्काम मोहम्मदी नगर भुसावळ), मोहम्मद अयाज मोहम्मद एजाज (वय 25 रा. सुलतानपुरा जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा), रविंद्र अंबादास घोडसे (वय 48 वर्ष रा. पळसोडा ता. संग्रामपूर जि. बुलढाणा सोनाळा) यांना विचारपूस केली. त्यांनी भुसावळ, जळगाव जामोद जि. बुलढाणा, बुन्हाणपुर (एम.पी), येथुन मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केले. 4 लाख 65 हजार रुपये किमतीच्या हिरो होन्डा, हिरो, बजाज कंपनीच्या एकुण 12 मोटर सायकली संशयित आरोपीतांकडून विविध ठिकाणावरुन जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक्षक डॉ. महेन्चर रेड्डी तसेच अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडधन, पोलीस उप निरीक्षक, मंगेश जाधव, यासीन पिशीर, महेश चौधरी, समाधान पाटील, निलेश चौधरी, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, दिनेश कापडणे, सचिन चौधरी, राहुल वानखेडे, भूषण चौधरी, जावेद शाह, प्रशांत सोनार, योगेश महाजन, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर अहाळे यांनी यशस्वी कारवाई केली आहे.

Back to top button