पुणे

मध्य रेल्वे रुळावर; 90 टक्के गाड्या सुरू

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे निर्बंध हळूहळू शिथिल झाल्यानंतर मध्य रेल्वे रुळावर आली आहे. 90 टक्के गाड्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर धावणार्‍या डेक्कन, इंटरसिटी एक्सप्रेससाठी मासिक पास आणि जनरल तिकीट सेवा सुरू करण्यात आली आहे. येत्या 22 मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने दररोज पुणे-मुंबई मार्गावर अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्य सरकारचे निर्बंध अजूनही कायम असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या सध्या पूर्णत: रिझर्व ट्रेन असून जनरलसाठी 29 जूनपासून अनारक्षित सेवा सामान्य जनतेसाठी खुली होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या पुण्यातून 300 रेल्वे गाड्या विविध मार्गांवर धावत होत्या. कोरोनामुळे सारे ठप्प झाले. आता हळूहळू रेल्वेची गाडी रुळावर येत आहे. लांब पल्ल्याच्या 230 रेल्वे गाड्या धावत आहेत.

त्यात झेलम एक्सप्रेस, पटना गोरखपूर, हावडा, नागपूर आदी रेल्वे गाड्यांचा
समावेश आहे लॉकडाउनपूर्वी बेचाळीस लोकल पुणे लोणावळा मार्गावर धावत होत्या. सध्या 20 लोकल गाड्या पुणे मार्गावर धावत आहेत.

कोरोना लसीचे दोन डोस, युनिव्हर्सल पास असेल तर तिकीट दिले जात आहे. शासनाचे या संदर्भातील नियम कायम असून नियम शिथील झाल्यानंतर सर्वांसाठी प्रवास योजना सुरू होईल.

लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रशासनाने 25 मार्च 2020 पासून रेल्वेची नियमित सेवा बंद केली होती. तेंव्हापासून केवळ आरक्षित तिकीट धारकांनाच रेल्वेतून प्रवासाची सुविधा देण्यात आली होती.

गेले काही दिवसांपासून रेल्वेची सेवा पूर्ववत करण्यात आली. त्यानंतर जनरल तिकीट, सीजन पासही सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, मध्य रेल्वेच्या विभागातील गाड्यांना पासधारकांना डबा किंवा जनरल डब्याची सुविधा न दिल्याने अडचण होती.

रेल्वे प्रशासनाने डेक्कन क्वीनसह पुणे-मुंबई मार्गावरील पुणे-मुंबई–पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, पुणे-मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस आणि पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस या गाड्यांना मासिक पास आणि जनरल डबे जोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार प्रवाशांना आता आरक्षित तिकीट यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. लॉकडाऊनपूर्वी द्वितीय श्रेणीचे मासिक पास 840 रुपयांना मिळत होते. मात्र, मासिक पास आणि जनरल तिकीट बंद असल्याने प्रवाशांना एका दिवसांत दोन्ही बाजूच्या प्रवासासाठी 210 रुपये मोजावे लागत होते.

त्यानुसार दररोज ये-जा करणार्‍यांना महिन्याला सहा हजार रुपये तिकिटासाठी लागत होते. त्यामुळे प्रवासासाठी सीजन पास ग्राह्य धरण्याची मागणी केली जात होती. प्रशासनाने ती मान्य केली आहे.

मध्य रेल्वेने पुणे-मुंबई दरम्यान धावणार्‍या दहा रेल्वेच्या सेवा पूर्ववत केल्या आहेत. दहा रेल्वेमधून आता पासधारकांना देखील प्रवास करता येणार आहे.

त्यासोबतच या रेल्वे गाड्यांना जनरल डबाही जोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-मुंबई दरम्यान धावणार्‍या इंटरसिटी एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस,

डेक्कन एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस गाड्यांमध्ये आरक्षित श्रेणीच्या बरोबर निर्धारित केलेल्या मासिक सिजन तिकीट आणि अनारक्षित श्रेणीच्या डब्यांच्या सेवा आणि सिंहगड एक्सप्रेसमधील आरक्षित श्रेणीच्या बरोबर निर्धारित केलेल्या अनारक्षित श्रेणीच्या डब्यांच्या सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

22 मार्चपासून ही सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि ज्यांच्याकडे युनिव्हर्सल पास आहे अशांना रेल्वेतून प्रवास करता येईल. याशिवाय 18 वर्षाखालील प्रवाशांनी वयाचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे, अशा प्रवाशांना तिकिटे दिली जातील आणि त्यांना जनरल डब्यातून प्रवास करण्याची सुविधा मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT