पुणे

पिंपरीत आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण मंगळवारी (दि. 21) आढळून आला.तो परदेशवारी करून आला असून, त्याच्यावर महापालिकेच्या भोसरीतील नवीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे.

आतापर्यंत शहरात ओमायक्रॉनचे एकूण 12 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 10 रुग्ण बरे झाले असून, त्याना घरी सोडण्यात आले आहे. परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या नागरिकांची तपासणी सुरू आहे.

आतापर्यंत 1 हजार 116 परदेशी व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 21 जणांचे अहवाल प्राप्त झाले.

परदेशातून आलेले 23 जण आणि त्यांच्या संपर्कात आलेले 23 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर, तब्बल 975 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

परदेशातून आलेल्या 5 जणांना तर, त्यांच्या संपर्कात आलेल्या 7 जण ओमायक्रॉन बाधित झाले आहेत. त्यातील 10 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. एक रुग्ण महापालिकेच्या भोसरी रूग्णालयात तर, शहराबाहेरील एक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल आहे.

दरम्यान, 46 कोरोना रुग्णांची पुन्हा दहाव्या दिवशी चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

ते सर्व होम आयसोलेट आहेत. उर्वरित परदेशी नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

दिवसभरात आढळले कोरोनाचे 56 नवे रुग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 56 नवे रुग्ण मंगळवारी (दि. 4) आढळून आले. शहरात सद्यःस्थितीत एकूण 367 सक्रिय रुग्ण आहेत. विविध रुग्णालयांत 214 रुग्ण उपचार घेत आहेत. तर, 153 रुग्ण होम आयसोलेट आहेत.

दिवसभरात एकूण 64 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत शहरातील 2 लाख 74 हजार 250 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उपचार घेत असलेला एक रुग्ण मंगळवारी दगावला.

दिवसभरात 4 हजार 89 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, 10 हजार 922 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. पालिकेच्या पथकाने 668 घरांना भेटी देऊन 1 हजार 607 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरात 24 मेजर व 254 मायक्रो कन्टेन्मेंट झोन आहेत.

https://youtu.be/6Od5mMZ4sb8

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT