महापालिकेत ओबीसींना मिळणार 45 जागा; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मोठा दिलास File Photo
पुणे

Pune Elections: महापालिकेत ओबीसींना मिळणार 45 जागा; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मोठा दिलास

ओबीसी आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांना मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

pune Municipal Corporation elections

पुणे: महापालिकेच्या आगामी निवडणुकीत इतर मागास प्रवर्गाला (ओबीसी) 27 टक्के आरक्षणानुसार 166 पैकी 45 जागा मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ओबीसी आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळल्यानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले होते. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या. (Latest Pune News)

आता सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश देतानाच 1994 पासून ते 2022 पर्यंत ओबीसींचे आरक्षण लागू होते, ते कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत कायम राहिले आहे. 8पान 4 वर

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत नगरसेवकांची संख्या 166 इतकी असणार आहे. त्यात अनुसूचित जातीसाठी 22, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षित असणार आहेत, तर 27 टक्के आरक्षणानुसार ओबीसींसाठी 45 जागा आरक्षित असणार आहेत.

खुल्या प्रवर्गासाठी 97 जागा उपलब्ध असतील, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने महापालिकेत 83 जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. त्या ओबीसीतून 23 जागा महिलांसाठी, अनुसूचित जातीतून 22, अनूसुचित जमातीतून एक आणि खुल्या प्रवर्गातील 48 जागांवर महिलांना संधी मिळणार आहे. याशिवाय खुल्या प्रवर्गातून महिलांना निवडणूक लढण्याची संधी उपलब्ध असल्याने महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

प्रवर्गनिहाय राखीव जागा

अंदाजित एकूण नगरसेवक 166

ओबीसी 45

अनुसूचित जाती 22

अनुसूचित जमाती 2

खुला प्रवर्ग 97

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT