पुणे

राज्यात ‘या’ दहा जिल्ह्यांमध्ये हिवताप रुग्णांची संख्या जास्त

अमृता चौगुले

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हिवताप आजाराच्या नियंत्रणासाठी पावले उचलण्यात येत आहेत. राज्यात यावर्षी हिवतापाचे 4546 रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचा वार्षिक परजीवी जंतू रुग्ण दर 1 पेक्षा कमी आहे. भारतामध्ये मुख्यत: प्लाझमोडियम फॅलसिपॅरम व मलेरिया या परजीवींमुळे हिवताप होतो. माणसाच्या शरीरात परजीवी यकृत पेशीमध्ये व नंतर रक्तातील पेशीमध्ये येतात. देशामध्ये 80 टक्के रुग्ण आदिवासी डोंगराळ अति दुर्गम व दुर्गम भागामध्ये राहणार्‍या लोकांमध्ये आढळून येतात.

हिवताप रुग्ण कमी करणे, मृत्यू कमी करणे हे राष्ट्रीय हिवताप निर्मूलनाचे मुख्य उद्दिष्ट असून, त्याप्रमाणे राज्यात पावले उचलली जात आहेत. देशात 2027 पर्यंत हिवताप रुग्ण नसणे आणि हिवताप रुग्ण शून्य झाल्यानंतर 2030 पर्यंत ते टिकविणे यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्रात गडचिरोली, ठाणे, चंद्रपूर, रायगड, गोंदिया, पालघर, पुणे, अमरावती, नागपूर आणि कोल्हापूर या दहा जिल्ह्यांमध्ये हिवतापाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. हिवताप नियंत्रणासाठी दर वर्षी विशेष मोहीम राबवली जात असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा 16 जूनपासून मोहीम राबवली जात आहे.

जीवजंतू दर

सन     दर

2020  0.10
2021  0.12
2022  0.12

एकूण हिवताप रुग्ण संख्या

वर्ष       रुग्ण
2020 12,909
2021 19303
2022 15451
2023 4547

लक्षणे कोणती?

  • ताप
  • डोकेदुखी
  • उलटी, मळमळ
  • थकवा जाणवणे
  • रक्तात लाल पेशींची
  • संख्या कमी होणे

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT