पुणे

अपार्टमेंटधारकांना मेंटेनन्समधून दिलासा; आता क्षेत्रफळानुसार दर आकारणार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अपार्टमेंट अ‍ॅक्ट 1970 मधील कलम 10 नुसार प्रत्येक अपार्टमेंटधारकाला त्याच्या क्षेत्रफळानुसारच मेंटेनन्सचा दर आकारला जावा, असा निर्णय उपनिबंधक कार्यालयातून देण्यात आल्याची माहिती ट्रेझर पार्क येथील रहिवासी नीलम पाटील, प्रमोद गरूड आणि अतुल इटकरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाल्या, मेंटेनन्सबाबत सोसायटीचा नियम सरसकट अपार्टमेंटधारकांना लागू केला जात होता. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात याबाबत तक्रार करण्यात आली. या तक्रारीची चौकशी करून अपार्टमेंट अ‍ॅक्ट 1970 मधील कलम 10 नुसार जुलै 2021 मध्ये सर्व अपार्टमेंटधारकांचा मेंटेनन्स अपार्टमेंट क्षेत्रफळानुसार काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाला पुन्हा आव्हान देण्यात आले. परंतु, हे आव्हान फेटाळून लावत 13 मे 2022 मध्ये पूर्वीचाच निर्णय लागू करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुण्यातील जवळपास 40 ते 50 हजार, तर राज्यातील एक लाख ते दीड लाख अपार्टमेंटधारकांना फायदा होणार आहे. जबरदस्तीने सोसायटीचे नियम लावणार्‍या सर्व अपार्टमेंटचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांना या गोष्टीने चपराक बसेल. सोसायटी मेटेनन्स वरून सोसायटी धारकांमध्ये होणारे वाद याप्रकारामुळे आता थोड्या फार प्रमाणात टळणार आहेत'

SCROLL FOR NEXT