बारामतीत दुचाकींसाठी नवीन वाहन क्रमांक मालिका PUDHARI
पुणे

Two-wheeler number series: बारामतीत दुचाकींसाठी नवीन वाहन क्रमांक मालिका

’एमएच 42 बीटी’ क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

बारामती: खासगी संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ’एमएच 42 बीटी’ क्रमांकाची नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. त्यामधील आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

ज्या खासगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल, त्यांनी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान धनाकर्षासह (डी.डी.) विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. (Latest Pune News)

यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा धनाकर्ष जमा करावयाचा असेल, त्यांनी 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजेपर्यत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता संबंधित अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा धनाकर्ष भरलेल्या व्यक्तीस नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.

13 ऑगस्ट रोजी केवळ दुचाकी वाहनाकरीता आकर्षक तसेच पसंती क्रमाकांचे विहित शुल्कासह अर्ज सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. एकाच क्रमांकाकरीता अधिक अर्ज आल्यास त्यांची यादी 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सूचना फलकावर लावण्यात येईल.

यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी 14 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजेपर्यंत जमा करता येईल. त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात उपस्थित पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल.

अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, छायाचित्र ओळखपत्र तसेच पॅनकार्डची स्वाक्षांकित प्रत आणि ’उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा बारामती येथील धनाकर्ष असावा. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नसल्याचे निकम यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT