Gold Scam
स्वस्त सोन्याच्या आमिषाने साडेदहा लाखांची फसवणूक; राजगड पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखलfile photo

Gold Scam: स्वस्त सोन्याच्या आमिषाने साडेदहा लाखांची फसवणूक; राजगड पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

पोलिस हवालदार नाना मदने हे पुढील तपास करीत आहेत.
Published on

सारोळा: स्वस्त सोनं मिळवून देतो, असे सांगून एकाला तब्बल साडेदहा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. भोर तालुक्यातील निगडे गावच्या हद्दीत दि. 16 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा प्रकाश तुपे (रा. वडजल, ता. माण, जि. सातारा), राहुल चव्हाण (रा. वराडे, ता. कराड), आणि बुवा ठाकुर (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी जयकुमार बाबासाहेब नरदेकर (वय 47, रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. (Latest Pune News)

Gold Scam
Yavat Voilence Update: सहा दिवसांनंतर यवतमधील जनजीवन पूर्वपदावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा तुपे, राहुल चव्हाण आणि बुवा ठाकुर या तिघांनी संगनमताने नरदेकर यांचा विश्वास संपादन केला. त्यांना 30 हजार रुपये प्रतितोळा दराने सोने देतो, असे सांगितले. त्यांच्या आमिषाला नरदेकर बळी पडले. तिघांनी नरदेकर यांना निगडे गावात पैसे घेऊन बोलावले. तेथे रोख साडेदहा लाख रुपये या तिघांना दिले. मात्र, त्यानंतर त्या तिघांनी सोने न देता नरदेकर यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस हवालदार नाना मदने हे पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news