पुणे: वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी उद्भवत होत्या. त्यानंतर भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन एनटीएने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 11 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जे विद्यार्थी कोणत्या कारणास्तव अंतिम मुदतीपर्यंत अर्ज भरू शकले नाहीत ते आता वाढीव तारखेच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज केल्यानंतर, शुल्क 11 मार्च रोजी रात्री 11.50 वाजेपर्यंत भरता येईल. अर्ज फक्त एनटीएच्या अधिकृत वेबसाईट पशशीं.पींर.पळल.ळप द्वारे ऑनलाइन सबमिट करता येतील. इतर कोणत्याही माध्यमातून सबमिट केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
गेल्या काही वर्षांत नीट परीक्षेसाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मागील वर्षी या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या 23 लाखांपेक्षा जास्त होती. त्यापैकी 22 लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
2024 मध्येही सुमारे 23 लाख 30 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 2023 मध्ये 20 लाख 38 हजार, 2022 मध्ये 17 लाख 64 हजार, 2021 मध्ये 15 लाख 44 हजार आणि 2020 मध्ये सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे सर्व आकडे पाहता विद्यार्थ्यांचा कल नीट परीक्षेकडे मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
...असा करा अर्ज
नीट यूजीचा अर्ज भरण्यासाठी, अधिकृत वेबसाईट पशशीं.पींर.पळल.ळपला भेट द्यावी. मुख्यपृष्ठावरील ‘ताज्या बातम्या’ अंतर्गत ‘छएएढ( णॠ) - 2026 साठी नोंदणी थेट आहे!’ वर क्लिक करा. प्रथम, विनंती केलेले तपशील भरून नोंदणी करा. नोंदणीनंतर, इतर तपशील प्रवीष्ट करून अर्ज पूर्ण करा. तुमच्या श्रेणीनुसार शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करून प्रिंटआउट घ्या.