NEET MDS Pudhari
पुणे

NEET MDS 2026 Registration: नीट एमडीएस 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू; 30 मार्चपर्यंत नोंदणीची संधी

डेंटल पदव्युत्तर प्रवेशासाठी 2 मे रोजी परीक्षा; बीडीएस पदवीधारकांना अर्ज करता येणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दंतवैद्यकीय क्षेत्रात पुढील शिक्षण घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - मास्टर ऑफ डेंटल सर्जरी अर्थात नीट एमडीएससाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने या परीक्षेसाठी 14 मार्चपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. देशभरातील इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट पलश.शर्वी.ळप ला भेट देऊन अर्ज करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना 30 मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, नीट एमडीएसची परीक्षा 2 मे 2026 रोजी होणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे संगणक आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. उमेदवारांना प्रश्न पूर्ण करण्यासाठी तीन तासांचा वेळ दिला जाईल. संबंधित परीक्षेचा निकाल 2 जूनला जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

ज्यांनी डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात डीसीआयद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून बीडीएस पदवी प्राप्त केली आहे. तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांकडे डीसीआय किंवा राज्य दंत परिषदेने जाहीर केलेले तात्पुरते किंवा कायमस्वरूपी नोंदणी प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे. परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांना 31 मे 2026 पर्यंत 12 महिन्यांची अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण केलेली आवश्यक आहे.

नीट एमडीएस 2026 साठी अर्ज शुल्क वेगवेगळ्या श्रेणींनुसार निश्चित केले गेले आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 3 हजार 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर एसी, एसटी आणि दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांना 2 हजार 500 रुपये भरावे लागतील.

..असा भरता येणार अर्ज

प्रथम, अधिकृत वेबसाइट, पलश.शर्वी.ळप किंवा परींलेरीव.शर्वी.ळप ला भेट द्या. नंतर, होमपेजवर प्रदर्शित नीट एमडीएस नोंदणी 2026 लिंकवर क्लिक करा. तुमची मूलभूत माहिती प्रविष्ट करा आणि लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा. नंतर, डॅशबोर्डवर लॉग इन करा आणि अर्ज फॉर्म भरा. अर्ज भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क ऑनलाइन भरा. शेवटी अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT