पुणे

NCB Raids : ‘एनसीबी’चे पुणे जिल्ह्यात छापे; जुन्नर, शिरूर परिसरातून 200 किलो ‘अल्प्रझोलम’ जप्त

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नाशिकमधील पाटील बंधूंच्या ड्रग्जच्या कारखान्यावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केल्यानंतर मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (अमलीपदार्थ विरोधी पथक-एनसीबी) पथकाने पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर तालुक्यात कारवाई केली. या कारवाईत एनसीबीच्या पथकाने 200 किलो अल्प्रझोलम जप्त केले.

मनोविकार, चिंंताविकारात वापरण्यात येणार्‍या औषधात अल्प्रझोलमचा वापर माफक प्रमाणावर केला जातो. त्यासाठी अन्न, औषध प्रशासन विभागाकडून मंजुरी दिली जाते. मनोविकार, चिंताविकारातील औषधी गोळ्यात वापरण्यात येणार्‍या अल्प्रझोलमचा वापर अमलीपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याचा संशय एनसीबीतील अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

जुन्नर, शिरूर तालुक्यात अल्प्रझोलमची बेकायदा निर्मिती होत असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने जुन्नर, शिरूर परिसरात छापा टाकून 200 किलो अल्प्रझोलम जप्त केले. एनसीबीच्या पथकाने याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना दिली असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकार्‍यांनी दिली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT