Nasrapur Case Pudhari
पुणे

Nasrapur Case: नसरापुरात वाढवला पोलिस बंदोबस्त; बालिका अत्याचार-हत्याप्रकरणी अंतिम निकाल २९ जूनला

आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

Nasrapur Child Murder Case: 

नसरापूर: भोर तालुक्यातील नसरापूरमधील साडेतीन वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणी न्यायालयाचा अंतिम निकाल गुरुवारी (दि. २५) अपेक्षित होता. मात्र, न्यायालयाने शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय सोमवारी (दि. २९ जून) जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला दोषी ठरविण्यात आले असून, त्याला कोणती शिक्षा सुनावली जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

१ मे रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आरोपी भीमराव कांबळेने खाऊचे आमिष दाखवून साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या निकालाकडे पीडित कुटुंबासह राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले होते.

गुरुवारी न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले. मात्र, शिक्षेबाबतचा अंतिम निकाल २९ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

निकाल लांबल्याने नसरापूरमध्ये शांततेचे वातावरण असले तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राजगड पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त कायम ठेवत अतिरिक्त पोलिस पथके तैनात केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT