Law Pudhari
पुणे

Nasarapur Case: नसरापूर बाल अत्याचार व खून प्रकरणी विशेष न्यायालयात जलदगती सुनावणी सुरू

आरोपी भीमराव कांबळे विरुद्ध 1100 पानी आरोपपत्र; इन कॅमेरा पद्धतीने सुनावणी होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी अटक आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात दाखल खटल्याची सुनावणी गुरुवारपासून (दि. 21 मे) विशेष न्यायालयात चालणार आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात दररोज सुनावणी घेऊन हा खटला जलदगतीने निकाली काढण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. खटल्याच्या प्रारंभी सरकार पक्षातर्फे भूमिका मांडून आरोप निश्चितीच्या प्रक्रियेसाठी अर्ज केला जाईल. आरोपनिश्चिती झाल्यानंतर खटल्याची सुनावणी सुरू होईल.

या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे (वय 65, रा. भोर) याच्याविरोधात पुणे ग््राामीण पोलिसांनी 1100 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय नियुक्त करण्यात आले आहे.

या खटल्याची संवेदनशीलता लक्षात घेत सुनावणी ‌‘इन कॅमेरा‌’ पद्धतीने होणार आहे. या गंभीर प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी ॲड. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14 दिवसांत तपास पूर्ण

पुणे ग््राामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांच्या नेतृत्वात निरीक्षक विजयमाला पवार यांच्यासह पथकाने 14 दिवसांत तपास पूर्ण करून आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा केले आहेत. त्यामध्ये पन्नासहून अधिक साक्षीदारांचे जबाब, आरोपीला पीडितेसमवेत पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय व न्यायवैद्यक अहवाल, सीसीटीव्ही चित्रीकरण आदी पुराव्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT