Narendra Modi Pudhari
पुणे

Narendra Modi Baramati Visit: पंतप्रधान मोदींचा बारामती दौरा तूर्तास रद्द; शरद पवारांची माहिती

विद्या प्रतिष्ठानमधील प्रेरणास्थळाचे होणार होते उद्घाटन; शरद पवारांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दौरा लांबणीवर, पुढील तारीख अनिश्चित

पुढारी वृत्तसेवा

बारामती: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा तुर्तास रद्द झाला असल्याची माहिती खा. शरद पवार यांनी शुक्रवारी (दि. २०) बारामतीत दिली. गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामती दौरा करणार असल्याची माहिती खा. शरद पवार व खा. सुप्रिया सुळे यांनी दिली होती.

अगोदर नवरात्रात ते येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी दौरा असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु तो दौराही लांबणीवर पडला होता. दरम्यानच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे खा. शरद पवार हे पुणे व मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे आता हा दौरा तुर्तास तरी रद्द झाला असल्याचे खा. पवार यांनी सांगितले.

दरम्यान खा. सुळे यासंबंधी म्हणाल्या, पाठीमागे या कार्यक्रमाची तारीख ठरली होती. परंतु खा. शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्याने ते रुग्णालयात होते. त्यामुळे तो दौरा झाला नाही. येथील विद्या प्रतिष्ठानमधील प्रेरणास्थळाचे उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार होते. परंतु आता या दौऱयाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT