Drinking Water Pudhari
पुणे

District Water Quality: नांदेडचे पाणी सर्वाधिक दूषित; साताऱ्यातील पाणी सर्वात शुद्ध, ‘जल जीवन मिशन’च्या तपासणीत निष्कर्ष

राज्यातील ५.६१ लाख नमुन्यांची तपासणी; २४ हजार ५७५ नमुने दूषित, मराठवाडा-विदर्भातील पाण्याची स्थिती चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

विनय पुराणिक

पुणे: राज्यामधील नांदेड जिल्हातील पाण्याची गुणवता सर्वात खराब असून, सातारा जिल्ह्यातील पाणी तुलनेने सर्वात चांगले असल्याचे 'अलजीवन मिशन' व्या या वर्षातील तपासणीत आढळून आले आहे. नदिहपाठोपाठ नागपूर, हिंगोली, परभणी आणि सोलापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्हातील पाणी दूषित असून, इतर जिल्ह्यांमधील दूषित पाण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे अहवालातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या गुणवत्ता विभागाकडून नागरिकांना घराघरांत नळ, कूपनलिकांद्वारे पुरविल्या जाणान्या विण्याच्या पाण्याची गुणवत्ता व्यवस्थापन माहिती प्रणाली विभागामार्फत केली जाते. त्यानुसार राज्यभरातील ३४ जिल्ह्यांतून पाच लाख ६१ हजार १०० पाण्यांचे नमुने गुणवत्ता तपासणी विभागाकडे प्राप्त झाले होते. या नमुन्यांची प्रयोगशाळांमध्ये रासायनिक (केमिकल) आणि जीवाणूजन्य निकासाच्या (बॅक्ट्रिओलॉजिकल पॅरामीटर्स) आधारानुसार रसायन, क्षार, धातू, असे या निरनिराळ्या निकषांसह औधाणूंचे मापदंड तपासण्यात आले आहेत.

त्यापैकी २४ हजार ५७५ नमुन्यांची गुणवत्ता खराब असून, तपासलेल्या प्रत्येक १०० नमुन्यांपैकी ४.७ नमुने दूषित आहेत, असे विभागाध्या तपासणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातून १९ हजार ७४ पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी रासायनिक दोष असलेले दोन हजार १५३ आगि जैविक निकषानुसार एक हजार २२६ असे एकूण १२ हजार ५२५ नमुते (२४.७३ टक्के) दुषित असून, यामध्ये प्रामुख्याने फ्लोराईड आणि नायट्रेटचे मापदंड कमी-अधिक आहेत

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातून (१४:७), हिंगोली (१३.९१, सोलापूर (२.२६), छत्रपती संभाजीनगर (९.५५७) अशाप्रकारे पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यांमधील सर्वच ठिकाणी पाणी दूषित नसून, ठरावीक गावांच्या पातळीवर ही परिस्थिती असल्याचे भूजल विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दत्तम्यान, स्थानिक पातळीवर या पाण्याच्या दीर्घकाळ सेवनाने आरोग्याच्या समस्या उद्‌भवू नये म्हणून संबंधित गुणवत्ता प्रभाव क्षेत्रात जिल्हा परिषद आणि जिल्हा विकास अधिकारी पातळीवर तातडीने प्रतिबंधात्मक आणि सुरक्षित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

साताऱ्याचे पाणी... सर्वात भारी

राज्यभरातून स्वतात जिल्हातील पाणी सर्वाधिक चांगले असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. साताऱ्यायातील प्राप्त नमुन्यांपैकी केवळ ०.३७ टक्केच पाणी दूषित असून, हे प्रमाण अत्यंत तुरळक असल्याचे अधिकारी सांगतात त्याचबरोबर ठाणे (०.४८), राप्नागिरी (०.६१), चंद्रपूर (०.२४) असे शून्य टक्क्यांपेक्षा कमी दूषित पाणी असलेले जिल्हे असून, येथील पाणी पिण्यासाठी चांगले असल्याचे अहवालातील आकडेवारीवरून सांगण्यात आले.

सरासरीत कोकणच आघाडीवर

राज्यात प्रशासकीय आणि महसुली सहा विभागांतील सरासरीनुसार कोकण विभागातील जिल्ह्यांचे पाणी असम आणि गुणवतापूर्ण आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील पिण्याची परिस्थिती सर्वसाधारण आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट आणि विदारक असल्याचे सरासरीवरून दिसून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT