Murlidhar Mohol Security Convoy Pudhari
पुणे

Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षा ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला कट; शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Murlidhar Mohol Security Convoy: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षा ताफ्याला दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने कट मारल्याची घटना पुण्यातील संचैती चौकात घडली.

Rahul Shelke

Murlidhar Mohol Security Convoy: केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षा ताफ्याला भरधाव दुचाकीस्वाराने कट मारल्याची घटना पुण्यातील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. संचेती  चौकातून मोहोळ यांचा सुरक्षा ताफा जात असताना हा प्रकार घडला. दुचाकीस्वाराने भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवत ताफ्याला कट मारल्याचा आरोप असून, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सुरक्षा ताफा शिवाजीनगर येथील संचेती चौकातून जात होता. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी ईश्वर लक्ष्मण भिकुले हे त्या ठिकाणी तैनात होते. ताफा चौकातून पुढे जात असतानाच एका दुचाकीस्वाराने वेगाने वाहन चालवत सुरक्षा ताफ्याला कट मारल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांच्या तक्रारीनुसार, नाना पेठ येथील शुभम विजय वनित (वय ३२) याने दुचाकी भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत मोहोळ यांच्या सुरक्षा ताफ्याला कट मारला. सुरक्षा ताफ्याच्या हालचाली सुरू असताना अशा पद्धतीने वाहन चालवल्याने ताफ्यातील वाहनांसह रस्त्यावरील इतर वाहनांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. तसेच निष्काळजी वाहनचालकामुळे नागरिकांच्या आणि इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या ताफ्याच्या आसपासची वाहतूक आणि वाहनांची हालचाल महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत सुरक्षा ताफ्याच्या अगदी जवळून वेगाने वाहन नेणे किंवा ताफ्याला ओव्हरटेक करणे हा सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार मानला जाऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची दखल घेत संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

या घटनेनंतर पोलीस कर्मचारी ईश्वर भिकुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे शुभम विजय वनित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी दुचाकी नेमक्या कोणत्या वेगाने चालवली जात होती, ताफ्याला ओव्हरटेक करताना परिस्थिती काय होती आणि या प्रकारामुळे प्रत्यक्षात कोणताही धोका निर्माण झाला का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत असून, घटनेशी संबंधित अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सुरक्षा ताफ्याशी संबंधित हा प्रकार असल्याने पोलिसांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT