Pune Ganeshotsav Traffic: गणेशोत्सवात पुण्याच्या पेठांमध्ये मालवाहतुकीला वेळेचे बंधन; पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच परवानगी!

१४ ते २४ सप्टेंबरदरम्यान हलक्या मालवाहू वाहनांसाठी वाहतूक पोलिसांचा निर्णय; लक्ष्मी रोड, मंडईसह मध्यवर्ती पेठांमध्ये नियम लागू
Ganeshotsav Traffic Diversion
Ganeshotsav Traffic DiversionPudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशोत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात (पेठ परिसरात) होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी विचारात घेऊन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या माल वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पेठ भागातील दुकानांमध्ये माल ने-आण (लोडिंग व अन-लोडिंग) करण्यासाठी विशिष्ट वेळेचे बंधन घालण्यात आले असून, दि. १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पहाटे २ ते सकाळी ११ या वेळेतच हलक्या मालवाहू वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

Ganeshotsav Traffic Diversion
Otur Rural Hospital: सुसज्ज इमारत, अत्याधुनिक सुविधा; तरी ओतूर ग्रामीण रुग्णालय ‘मनुष्यबळाअभावी’ आजारी!

वाहतूक शाखेकडून विशेष उपाययोजना

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील मुख्य बाजारपेठा आणि मध्यवर्ती पेठांमध्ये नागरिकांची व भक्तांची अभूतपूर्व गर्दी होते. या काळात रस्त्यांवरून धावणाऱ्या मोठ्या व मालवाहू वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची किंवा सुरक्षेची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. नागरिकांच्या जिवाचा धोका टळावा आणि शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष उपाययोजना करण्यात आली आहे.

Ganeshotsav Traffic Diversion
Pune Ganesh Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात आज दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप!

नागरिकांनी सहकार्य करावे

बोहरी आळी, गणेश पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, मंडई परिसर, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड व इतर मध्यवर्ती पेठांचा भाग यासाठी ही नियम लागू करण्यात आले आहे. या वाहतूक नियमांमधून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पूर्णपणे वगळण्यात आले आहे.

Ganeshotsav Traffic Diversion
Pune Ganeshotsav: ‘मोरया मोरया’च्या जयघोषात पुण्यनगरी गणेशमय; मानाच्या पाचही गणरायांचे दिमाखात आगमन!

रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलिस वाहने आणि इतर आपत्कालीन सेवा पूर्ववत सुरू राहणार आहे. दरम्‍यान वाहतूक पोलिसांनी दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करून व्यापाऱ्यांनी आपला माल लोड-अनलोड करावा. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि वाहतूक कोंडीमुक्त पार पाडण्यासाठी सर्व व्यावसायिक व नागरिकांनी पुणे शहर वाहतूक पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news