पुणे

पुणे : कुंड्या, झाडे खरेदी वादात; किमतींची खातरजमा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जी 20 परिषदेच्या निमित्ताने रस्ते व पुलांवरील सुशोभीकरणासाठी खरेदी करण्यात येणार्‍या लाखो रुपये किमतीच्या कुंड्या आणि विदेशी प्रजातीच्या शोभिवंत झाडांची खरेदी वादात सापडली आहे. निविदेतील किमतींची खातरजमा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यात होणार्‍या जी 20 परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने शहरातील प्रमुख पाच रस्त्यांवर सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

यासाठी रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर फ्लॉवर बेड करणे, झाडांचे ट्रीमिंग करणे या कामांचा समावेश आहे. तसेच या मार्गावरील पुलांवर विदेशी प्रजातीची शोभिवंत झाडे असलेल्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. कडक उन्हाळा सुरू असताना दुभाजकांवरील फ्लॉवर बेडचे आयुष्य जेमतेम चार ते पाच दिवसांचे असणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT