Mundhwa Kalbhairavnath Kushti Akhada Pudhari
पुणे

Mundhwa Kalbhairavnath Kushti Akhada: मुंढव्यात क्षेत्रपाल कालभैरवनाथ उत्सवानिमित्त 52 कुस्त्या निकाली

नामवंत पहिलवानांचा दमदार सहभाग; स्थानिकांकडून भरघोस रोख बक्षिसांची उधळण

पुढारी वृत्तसेवा

मुंढवा : मुंढव्यातील श्री क्षेत्रपाल कालभैरवनाथ उत्सवानिमित्त कुस्ती आखाडा आयोजित केला होता. मुंढवा येथील ताडीगुत्ता चौक ते रेल्वेस्टेशन या मुख्य रस्त्याच्या बाजूला आयोजित कुस्ती आखाड्यामध्ये नामवंत पहिलवानांच्या 52 कुस्त्या आयोजित केल्या होत्या. सुमारे सहा तास चाललेल्या या कुस्ती आखाड्यामध्ये स्थानिक तसेच महाराष्ट्रातील अनेक पहिलवान सहभागी झाले होते. या आखाड्यामध्ये सर्व कुस्त्या निकाली ठरल्या. मुंढव्यातील नागरिकांनी प्रत्येक कुस्तीला भरघोस रोख रकमेचे बक्षीस जाहीर केले होते.

या कुस्ती आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती शिवराज राक्षे व विरेंदर सिंग यांच्यामध्ये झाली. यात शिवराज राक्षे यांनी विजय मिळविला. रायबासेठ गायकवाड आणि कुटुंबीयांच्या वतीने या कुस्तीसाठी बक्षीस देण्यात आले. दुसऱ्या क्रमांकासाठी महेंद्र गायकवाड व प्रकाश बनकर यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड विजेते ठरले. नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यातर्फे या कुस्तीसाठी बक्षीस देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती भारत मदने व पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील विजयी झाले. नगरसेवक किशोर धायरकर यांच्या वतीने या कुस्तीसाठी बक्षीस देण्यात आले.

हिंदकेसरी अभिजित कटके, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, अर्जुन पुरस्कारविजेते गोविंद तात्या पवार, पै. शरद पवार, वस्ताद हनुमंतराव गायकवाड यांची कुस्ती आखाड्याच्या ठिकाणी उपस्थिती होती. मुंढवा ग््राामस्थांपैकी सागर कोद्रे, युवराज गायकवाड, संतोष पाखरे, अविनाश गायकवाड, धैर्यशील गायकवाड, गणेश लोणकर या युवकांनी पुढाकार घेऊन कुस्ती स्पर्धा यशस्वी केली. नगरसेवक किशोर धायरकर, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेवक डॉ. दादा कोद्रे व ग््राामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT