Crime News pudhari photo
पुणे

Pune Crime News: सासूवर सुनेचा चाकू हल्ला; पुण्यात धक्कादायक घटना

जाब विचारल्याचे कारण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मुलाला मारहाण व डोळ्यांत तिखट टाकल्‍याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या साठवर्षीय सासूला तिच्याच सुनेने आणि इतर महिलांनी संगनमत करून चाकूने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी सून रूपाली मनोज धोत्रे, वैजंता अनिल जाधव आणि पूजा विजय जाधव (सर्व रा. गायरानवस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे) यांच्यावर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मालन अंबादास धोत्रे (वय ६०, रा. टाकळी अमिया, ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ जुलै रोजी दुपारी बारा वाजता गायरानवस्ती येथे ही घटना घडली. मालन यांच्या मुलाला आरोपींनी मारहाण केल्याने त्या जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या.

"माझ्या मुलाच्या डोळ्यांत तिखट चटणी का टाकली आणि त्याला का मारले" असे विचारले असता वैजंता जाधव हिला राग आला व तिने मालन यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर सून रूपाली हिने हाताने मारहाण करून चाकूने मालन यांच्या हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, पूजा जाधव हिने देखील त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT